आदिशक्ती….महाशक्ती..वरदायिनि दिव्याशक्ती तु……
तू रूप कर्तृत्वाचे..प्रेम .वात्सल्याची सगुण मूर्ती तू….
विश्वाचा आकार तू…आकाशा एवढी उत्तुंग तू..
माळीनगर (युगारंभ )-महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग,यशवंतनगर प्रशालेमध्ये ‘जागतिक महिला दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी भाईनाथ महाराज यांच्या साधक व दुर्गा वाहिनी जिल्हा संयोजिका पश्चिम महाराष्ट्र प्रांत सुरक्षा प्रमुख कु.गायत्री देशपांडे या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून कुमारी कुलकर्णी मॅडम,अबॅकस मार्गदर्शिका सौ.घुले मॅडम उपस्थित होत्या,माता पालक संघातील सर्व पालक उपस्थित होत्या..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.गोडसे मॅडम यांनी केले व कु.देसाई मॅडम यांनी जागतिक महिला दिनाचे महत्व व आज महिला कोणत्या आघाडीवर काम करत आहेत हे सर्वांना आपल्या भाषणातून सांगितले..
आजची महिला सक्षम तर आहेच आणखी बलवान व्हायला हवी असे प्रतिपादन कार्यक्रमच्या अध्यक्षा कु.गायत्री देशपांडे यांनी या प्रसंगी केले..कु.गायत्री देशपांडे यांनी प्रशालेतील मुलींना स्व: संरक्षण कसे करावे…..याबाबतीत कराटे चे प्रात्यक्षिक दाखवले .
सौ.घुले मॅडम यांनी …मुलांनी पारंपरिक गणिती क्रियांसोबत अबँकस पद्धतीने गणित शिकावयास हवे असे सांगून मुलांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण मोफत घेण्याचे आश्वासन दिले..
सुत्रसंचालन कुमारी गुंजन कारमकर हिने केले.सई लोखंडे व अनन्या बनकर यांनी सत्कार वाचन केले.आभार कुमारी शेख मॅडम यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालवाडीच्या सर्व महिला शिक्षिका आणि प्राथमिक विभागातील सर्व महिला शिक्षकांनी परिश्रम घेतले..