माळीनगर (युगारंभ )-देवेंद्र फडणवीस यानी जो अर्थ संकल्प मांडला तो अर्थसंकल्प जनतेसाठी नसून ते पंचामृत आहे .पण फसव्या भाजपच्या सवयी नुसार त्या अर्थ संकल्पाच्या “पंचामृत मे मीठा कम ज्यादा पाणी ” असा हा अर्थ संकल्प आहे.आघाडी सरकारने ज्या योजना राबवल्या होत्या त्याच जुन्या योजनांना परत मंजुरी दिली आहे. म्हणजे दुसऱ्याचं पोरग तेच माझ पोरग असा हा अर्थसंकल्प आहे .
आधीच हे शिंदे फडवणीस सरकार जनतेला मान्य नाही ते सरकार जनतेसाठी काय अर्थसंकल्प मांडणार. त्यामुळे शिवसेना युवासेना माळशिरस तालुक्याच्या वतीने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे,शिवसेना तालुका प्रमुख संतोष भैय्या राऊत, शिवसेना अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे,युवा सेना अकलूज शहर प्रमुख शेखर भैय्या खिलारे यांच्या नेतृत्वाखाली जनतेला गाजर वाटून अर्थ संकल्पाचा जाहीर निषेध केला.
यावेळी शिवसेना तालुका उपप्रमुख महादेव बंडगर, युवा सेना उपतालुका प्रमुख डॉ निलेश कांबळे, युवा सेना उपतालुका प्रमुख दत्ता भाऊ साळुंखे ,शिवसेना विभाग प्रमुख पिंटू तात्या चव्हाण, मिलिंद मोरे,नवनाथ इंगळे,विकास भोई,मोनू इंगळे,आदित्य इंगळे,गणेश काळे इ.शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते