December 8, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हाराज्य

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी सोलापूर येथे मॉलसाठी जागा व निधीही उपलब्ध करुन देवू- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

माळीनगर(युगारंभ)- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व महिला दिनाचे औचित्य साधून महिला आर्थिक विकास महामंडळ, शिवरत्न वेल्फेअर ट्रस्ट व डॉटर मॉम्स फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नव उद्योजक महिला व ४४१ महिला बचत गटांना २१ कोटी ७७ लाख रुपये रकमेचा कर्ज धनादेश वितरण महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

  यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील,आ. राम सातपुते, मदनसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, शितलदेवी मोहिते-पाटील, वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

   पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महिला बचत गटाच्या माध्यमातून सहकार चळवळीला गती येत असून आपण नगर जिल्ह्यात व मोहिते पाटलांनी सोलापूर जिल्ह्यात ही चळवळ गतीमान केली. या चळवळीला गती देण्यासाठी आपण आवश्यक सहकार्य करु. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी सोलापूर येथे मॉलसाठी जागा व निधीही उपलब्ध करुन देवू, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी माजी सभापती वैष्णवीदेवी व शितलदेवी मोहिते पाटील यांचे यावेळी कौतुक करून शिवरत्न वेल्फेअर ट्रस्ट व डॉटर मॉम्स फाउंडेशनने महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

  या समारंभास बाबाराजे देशमुख, अ‍ॅड. मिलिंद कुलकर्णी, अ‍ॅड. प्रकाश पाटील, माजी सभापती शोभाताई साठे, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, प्रतापराव पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, सोमनाथ लामगुंडे, रणजित शेंडे, सोमनाथ भोसले यांच्यासह तालुक्यातील आजी – माजी सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, विविध संस्थाचे पदाधिकारी व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related posts

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जळोली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

yugarambh

सोलापूर जिल्ह्यात चारा डेपो चालू करा युवा सेनेची मागणी.अन्यथा उग्र आंदोलन -गणेश इंगळे

yugarambh

जिजामाता कन्या प्रशालेत महिला दिन उत्साहात साजरा

yugarambh

राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या नावावर होणार जमिन.-आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानपरिषदेत केला होता पाठपुरावा

yugarambh

श्री.जयसिंह मोहिते- पाटील प्राथमिक शाळा संग्रामनगर प्रशालेमध्ये ‘प्रवेशोत्सव´.

yugarambh

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिना निमित्त गणेश नगर अकलूज येथे पाणीपुरी फ्री 

yugarambh

Leave a Comment