December 8, 2023
yugarambh
Breaking News
Other

महाड येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीची ‘अभिवादन क्रांती सभा’ संपन्न

अकलूज (युगारंभ )-चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या 96 व्या वर्धापन दिनानिमित्त महाड येथे 20 मार्च 2023 रोजी दुपारी 4 वाजता जगप्रसिद्ध लॉंगमार्च प्रणेते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार आदरणीय प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये क्रांती भूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीची अभिवादन क्रांती सभा संपन्न झाली .

सभा सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व  क्रांती स्तंभाला आदरणीय कवाडे सर व जयदीपभाई कवाडे यांनी अभिवादन केले.याप्रसंगी या क्रांतीसभेला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवा नेते भाई जयदीप कवाडे, पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदासजी इंगोले,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार गोंधळी, प्रदेश प्रवक्ते व कोकण संपर्कप्रमुख राजेश जाधव, मुंबई प्रदेशाध्यक्ष विजय वाघमारे, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सोमनाथ भोसले इ. नेत्यांनी मार्गदर्शन केले,तर मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक रायगड जिल्हाध्यक्ष सितारामपंत कांबळे यांनी केले.

यावेळेस या सभेला मुंबईतील प्रमुख नेते अण्णाप्पा शिंगे , आनंद कडाळे, उमेश वाघमारे, सोपान पवार, विश्वास जाधव, अन्वरभाई ,लताताई नागावकर, सचिन तांबे ,सुशील गंगावणे, यासह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने क्रांती मंचावर उपस्थित होते.

Related posts

भिमजयंती मोठया उत्साहाने लवंग (भिलारे वस्ती )येथे साजरी

yugarambh

हास्यसम्राट फेम  – जितेश कोळी यांचा ‘हास्यतुषार’ कार्यक्रम

yugarambh

मराठीतून वैश्विकतेकडे

yugarambh

सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग,अकलूज येथे ‘सहकार महर्षि’ यांना अभिवादन

yugarambh

जि. प. आदर्श प्राथमिक शाळा चाकोरे येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न

yugarambh

अकलूज येथे काँग्रेस कमिटीची सभासद नोंदणी उत्साहात सुरू.

yugarambh

Leave a Comment