लवंग(युगारंभ )-राष्ट्रीय अध्यक्ष लॉंगमार्च प्रणेते माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र जी कवाडे सर,राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या निवडीची बैठक पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तर महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांनी निवडी जाहीर केल्या.
रविवार २ एप्रिल रोजी रोटरी क्लब टेंभुर्णी येथील हॉलमध्ये या निवडीचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष लॉंगमार्च प्रणेते माजी खासदार जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यानंतर निवडीच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी टेंभुर्णी येथील निलेश खरात यांची,तर पंढरपूर तालुका संपर्कप्रमुखपदी जळोली येथील सावता नवगिरे यांची यांची निवड सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांनी जाहीर करून निवडीचे पत्र राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे व महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे म्हणाले की पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून समाज हिताची कामे करून सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास दूर करून त्यांना न्याय द्यावा व या माध्यमातून पक्षाची ताकद माढा व पंढरपूर तालुक्यात वाढवावी.सामाजिक काम करत असताना कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले व सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.