लवंग (युगारंभ )-महाराष्ट्र फाउंडेशन सामाजिक व शैक्षणिक संस्था, माळीनगर यांचे ८वे वर्धापन दिनानिमित्त महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथील सहशिक्षक श्री अनिल प्रभाकर जाधव यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०२२-२३ प्राप्त झाला.
दिनांक ०४/०४/२०२३ रोजी मा.सहाय्यक पोलीस आयुक्त मा.दिपक आर्वे साहेब यांचे शुभहस्ते व जिल्हा क्रीडा अधिकारी मा.नितीन तारळकर साहेब, मा.सुभेदार मेजर ठाकूर, मा.कर्नल जाधव साहेब, आमची माती आमची माणसे चे अँकर अक्षय बनकर, बालरोग तज्ञ डॉ.एकतपुरे अकलूज, मा.अध्यक्ष रणजित लोहार यांचे प्रमुख उपस्थित प्रदान करण्यात आला.