माळीनगर (युगारंभ )- “महाराष्ट्र फौंडेशन” या संस्थेच्यावतीने मंगळवार दि 04 एप्रिल रोजी लोकमान्य टिळक सभागृह, सोलापूर या ठिकाणी हा सोहळा पार पडला.
या कार्यक्रमास राज्य मार्गदर्शक राजेश क्षिरसागर शिक्षण उपसंचालक पुणे, रघुनाथ पांढरे बी डी ओ, प्रल्हाद नवगन, अकलूज, अध्यक्ष राज्य सल्लागार दिपक आर्वे .सी.पी. सोलापूर, अशोक दुधारे सर शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र शासन, सचिव राज्यसल्लागार बलवंत सिंग मुंबई ;कायदेशीर सल्लागार अॅड. श्री. सिताराम झंजे माळशिरस; मानद संचालक सुहास छंचुरे सोलापूर,आदेश नवगन अकलूज, रणजित लोहार आदी उपस्थित होते.
आशा लोखंडे या मागील वर्षी प्राथमिक शाळा क्रमांक एक माळीनगर शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना सावित्रीबाई फुले आदर्श सेवानिवृत्त मुख्याध्यापिका या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.