अकलूज (युगारंभ )- महिलांना 50 टक्के प्रवासात सवलत देऊन जनतेची मने जिंकण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात राज्य परिवहन महामंडळाला बस दुरुस्त करण्याचा प्रयत्न करावा लागणार हे नक्की…!

तारकपूर डेपो ची गाडी बस क्रमांक एम एच 14 बीटी 49 99.. अहमदनगर ते सोलापूर…अहमदनगर स्टॅन्ड वरूनच गाडी निघाली हलत डुलत… तब्बल 15 किलोमीटरच्या प्रवासानंतर ड्रायव्हरच्या लक्षात आले की गाडी वेगाने जाऊ शकत नाही… त्यांनी तात्काळ वाहतूक व्यवस्थापकांशी संपर्क साधला… पंधरा मिनिटांच्या फोनाफोनी नंतर निरोप आला गाडी आहे तशीच घेऊन जा…..

आता लोकांचे भांबवलेले चेहरे… अन गाडीची गती दोन्ही एक सारखीच व्हायला लागली…. अखेर पुन्हा पंधरा मिनिटाच्या प्रवासानंतर गाडी थांबली…. पुन्हा फोन सुरू झाले…. आता मात्र वाहक आणि चालक या दोघांनाही प्रवाशांच्या बोलण्याला सामोरे जाण्याची वेळ आली…. परंतु वरूनच नगरच्या डेपोतूनच या दोघांनाही सहकार्य झालं नाही… आणि पन्नास लोकांची ही बस पुन्हा एकदा रस्त्यावर…
मग लोकांचं बोलणं सुरू झालं…. गतिमान सरकार मोदीजीं चा फोटो शिंदे साहेबांचा फोटो फडणवीसांचा फोटो….. आणि बंद पडलेल्या एसटीत सरकार बंद पाडण्याच्या गप्पागोष्टी सुरू झाल्या….
लहानगी पोर आईला मिठी मारून बसली होती… आडवळणातल्या गावात आपण आता कसं पोहोचायचं या चिंतेत अनेक गावकरी बसले होते…. परंतु केबिन मधून गप्पागोष्टी मारणाऱ्या… वाहतुकीचे नियंत्रण…. आणि महामंडळाची जबाबदारी घेणाऱ्या अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती पहायला किमान 30 किलोमीटर यावे लागले असते…..
गाडी दुरुस्तही होईल किंवा दुसरीही येईल… परंतु महामंडळाच्या अधिकाऱ्यांची मानसिकता कधी दुरुस्त होणार…. आणि जनतेला आकर्षित करण्याच्या नादात महामंडळ बस कधी दुरुस्त करणार…
इशियाड तिकिटाचा दर काढून… रस्त्यावर वेळ घालवणाऱ्या प्रवाशांनी नेमकी तक्रार कोणाकडे आणि कुठे करायची हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच असणार आहे….