लवंग (युगारंभ )-शिल्पकार जयंती महोत्सव समिती घरमाळकर गट, भिलारे वस्ती, लवंग तालुका माळशिरस यांच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
दि.14 एप्रिल 2023 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यावर्षी समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड झाली.याप्रसंगी मंडळाचे अध्यक्षपदी धिरज ओहोळ यांची निवड झाली आहे,तर उपाध्यक्षपदी सनी खंदारे व राहुल भिलारे यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्य पदी माऊली भोईटे, खजिनदारपदी पुण्यवंत कांबळे आणि सचिव पदी विनोद सरवदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक उत्तम (बापू) भिलारे, युवा नेते प्रशांत भिलारे, मंडळाचे कट्टर कार्यकर्ते लखन जाधव व युवराज भिलारे या सर्वांच्या उपस्थितीत सर्व सदस्यांची निवड करण्यात आली.