माळीनगर (युगारंभ )-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने २५ किलो जिलेबी वाटप करण्यात आली.
प्रथम अकलूज येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते 25 किलो जिलेबी वाटप करण्यात आली.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष सचिन कांबळे,युवक तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड,तालुका कार्याध्यक्ष हेमंत कांबळे,अकलूज शहर संपर्कप्रमुख शिवाजी खडतरे,तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे,तालुका संघटक पांडुरंग चव्हाण,तालुका संपर्कप्रमुख शिवम गायकवाड,अकलूज शहर कार्याध्यक्ष कबीर मुलाणी,अकलूज शहर युवक कार्याध्यक्ष शहाजी खडतरे,सचिव सादिक बागवान,राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज युवक शहराध्यक्ष अविनाश सोनवणे,राजू बागवान,अमोल भोसले,बन्नीभाई धाइंजे,मन्सूर काझी,अनिकेत शिंदे,नय्युम बागवान,कन्हैया साळुंखे आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.