लवंग (युगारंभ )-आज दिनांक14/04/2023 रोजी श्री. जयसिंह मोहिते- पाटील विद्यालय प्राथमिक विभाग संग्रामनगर या आपल्या प्रशालेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करण्यात आली प्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक बी. टी शिंदे सर होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती इयत्ता दहावीतील सना शेख व सोनाली खाडे या विद्यार्थिनींनी व प्रशालेतील सहशिक्षिका कोरेकर मॅडम यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेमध्ये चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
प्राथमिक विभागांमध्ये इयत्ता दुसरी व तिसरी गटातून चित्रकला स्पर्धेमध्ये साईराज दत्तात्रय खाडे(प्रथम)समर्थ किरण काळे (द्वितीय) सोहम गणेश पवार (तृतीय) इयत्ता तिसरी व चौथी गटातून मनस्वी विनायकराव गंभीरे(प्रथम निशिगंधा गणेश तोरस्कर(द्वितीय) श्रुती बिटाजी खाडे (द्वितीय) वेदा किरण काळे (तृतीय) अंकिता उमेश पवार (तृतीय) श्रुती अभिमान मोरे (उत्तेजनार्थ)8वी ते 10 वी गटातून रांगोळी स्पर्धेमध्ये संतोषी सोमनाथ नरवडे (प्रथम) कल्याणी अंकुश शिंदे (द्वितीय) कल्याणी अजिनाथ पारसे (तृतीय) सिद्धी प्रकाश शिंदे (उत्तेजनार्थ) 5 वी ते 8वी गटातून चित्रकला स्पर्धेमध्ये सुजाता सोमनाथ नरवडे (प्रथम) अविष्कार संग्राम खरात (व्दितीय) मृणाली बिटाजी खाडे (तृतीय) 8वी ते 10वी गटातून सायली गणेश पवार (प्रथम) आकाश राजकुमार आयवळे (द्वितीय) गायत्री उमेश पवार (तृतीय) तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रशालेचे मुख्याध्यापक बी. टी शिंदे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांमधून माणसाने माणसाप्रमाणे माणसाबरोबर वागणे हीच खरी बंधूता आहे या बंधुतेच्या व्याख्या प्रमाणे माणसाने आपले जीवन जगले पाहिजे व हीच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली आहे असे सांगितले
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी. शिंदे सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक फिरोज तांबोळी सर व प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील ज्ञानेश्वरी कदम व कल्याणी शिंदे या विद्यार्थिनींनी केले प्रास्ताविक सायली पवार व अनुमोदन साक्षी ढगे या विद्यार्थिनींनी केले आभार ग्यानी भारती या विद्यार्थिनी मानले.