December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हाफोटो

माळशिरस तालुका व अकलूज परिसर फोटो ग्राफर संघटनेचा स्नेह मेळावा 2023 संपन्न

यशवंतनगर (युगारंभ )- अकलूज येथे माळशिरस तालुका व अकलूज परिसर फोटोग्राफर संघटनेचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता व त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन संघटनेच्या वतीने करण्यात आले होते.

   यामध्ये सर्व फोटोग्राफर यांचेसाठी वर्कशॉप आणि जेष्ठ फोटोग्राफर यांचा सन्मान सोहळा यानिमित्त पार पडला. सदर कार्यक्रमासाठी मुंबईहून श्री.अरुण कणसे सर आणि यशवंत बिराजदार सर -सोलापूर यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले,तसेच सोलापूर येथील मा.दत्ता सर,आनंद सर, अमोल सर,संतोष सर, ज्ञानेश्वर सर यांनी हि उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन केले 

याप्रसंगी ज्येष्ठ फोटोग्राफर मा.गायकवाड मामा, एम.आर., हरिभाऊ बनसोडे,गंगाधर मामा यांनी ही मनोगत व्यक्त केले.

 या उपक्रमात अकलूज तसेच परिसरातील सर्व फोटोग्राफर मित्रांनी उपस्थित राहून जो विश्वास  दर्शवला त्याबद्दल  सोमनाथ माने( अध्यक्ष) व कादर शेख (उपाध्यक्ष)  यांनी सर्वांचे आभार व्यक्त करीत असाच विश्वास आमच्यावरती यापुढेही ठेवावा आणि आम्हाला आपली संघटना पुढे नेण्यासाठी सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती केली.

छाया -कादर शेख (निहाल फोटो, अकलूज )

 

Related posts

श्री.जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय संग्रामनगर मध्ये काका साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!!

yugarambh

भोंडला कार्यक्रमातून स्त्रीशक्तीच्या एकीचा जागर होतो -निशा गिरमे

yugarambh

श्रीमती विठाबाई रामचंद्र भिलारे यांचे निधन.दत्तात्रय भिलारे यांना मातृशोक

yugarambh

शिवामृत-चेअरमन मा.धैर्यशील(भैय्यासाहेब) मोहिते पाटील व व्हॉईस चेअरमन पदी मा.दत्तात्रय भिलारे(भाऊ )

yugarambh

मोहिते-पाटील शाळेत जंतनाशक मोहीम अंतर्गत जंतनाशक गोळ्यांचे वाटप.

yugarambh

yugarambh

Leave a Comment