December 8, 2023
yugarambh
Breaking News
राज्य

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचणे महत्वाचे : सहायक आयुक्त संगीता डावखर

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात महात्मा फुले यांच्या जयंतनिमित्त जिल्हास्तरीय विविध स्पर्धा संपन्न

 पुणे (युगारंभ )-महाज्योती नागपूर, समाजकल्याण विभाग पुणे आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय , पौड रोड यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयीन स्तरावर जिल्हास्तरीय चित्रकला, रांगोळी, निबंध, वक्तृत्व, एकांकिका व एकपात्री प्रयोग इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील वक्तृत्व व एकांकिका अंतिम फेरीतील स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त संगीता डावखर उपस्थित होत्या. शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. कवठनकर यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. समाजकल्याण विभागाच्या मार्गदर्शनातून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गंगाधर सातव यांनी सांगितले.

               ” भारतीय समाजसुधारकांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणा देणारे असून महात्मा फुले यांनी आधुनिक भारतीय समाजाची पायाभरणी केली. त्यांचे ग्रंथ आजच्या काळासाठीही मार्गदर्शक असून नव्या पिढीने ते वाचले पाहिजेत . त्यांचे कार्य समजून घेतले पाहिजे, त्याकरिता या स्पर्धा युवकांना स्फूर्ती देतील” असे संगीता डावखर म्हणाल्या. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी नव्याने सुरू झालेल्या विविध शासकीय योजनांची माहितीही दिली.

वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संस्कार मंदिर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. राजेंद्र थोरात व प्रसिद्ध निवेदक, वक्त्या व लेखिका स्वाती महालंक यांनी कार्य केले तर एकांकिका व एकपात्री प्रयोग स्पर्धेसाठी युवराज देवकर व सागर शिंदे हे परीक्षक होते.या स्पर्धांचा निकाल पुढीप्रमाणे:

वक्तृत्व स्पर्धा :
प्रथम क्रमांक : संतोष शिंदे, जेएसपीएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय, हडपसर
द्वितीय क्रमांक: स्नेहा भंडारी, अभियांत्रिकी महाविद्यालय, मांजरी, पुणे
तृतीय क्रमांक : रोहन कवडे,कला वाणिज्य महाविद्यालय, वारजे, पुणे

कनिष्ठ विभाग, प्रथम क्रमांक : रोशनी गुप्ता, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, पौड रोड, पुणे.

एकांकिका व एकपात्री प्रयोग :
प्रथम क्रमांक: एकांकिका,” मी ज्योतीबा,मी सावित्री “, इन्सर्च इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड स्टडीज, पुणे
प्रथम क्रमांक :एकपात्री , नम्रता अडसूळ, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर
द्वितीय क्रमांक:एकपात्री, प्रियांका मारणे, अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट, पुणे
तृतीय क्रमांक : एकपात्री, कल्याणी पाटील, धारेश्वर नर्सिंग महाविद्यालय, पुणे.

                 स्पर्धांमुळे विद्यार्थी वाचनाकडे वळतात. उद्याचे वक्ते, विचारवंत, नेतृत्व स्पर्धांमधून घडते. पण त्यासाठी शिवाजीराव भोसले म्हणत त्याप्रमाणे वक्तृत्वासाठी वेडे झाले पाहिजे, असे डॉ. राजेंद्र थोरात यांनी सांगितले तर वक्तृत्व कसे असावे याबद्दल स्वाती महलंक यांनी मार्गदर्शन केले.

उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शोभा तितर यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ. सुनीता डाकले, डॉ. मेघना भोसले, श्री. विनोद रणपिसे. डॉ.रुपाली शेंडकर,प्रा. लक्ष्मण उकिरडे,डॉ. स्वाती शिंदे,प्रा. नीता देशमुख,प्रा. स्मिता चव्हाण,प्रा. स्नेहा हिंगमिरे प्रा. अमृता मोरे यांनी परिश्रम घेतले.

Related posts

महर्षि प्रशालेचा बास्केटबॉल संघ जिल्ह्य़ात प्रथम ; विभागीय स्पर्धेसाठी निवड

yugarambh

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी अखेर उपोषण सोडलं आहे.

yugarambh

काँग्रेस नसती तर… ; राज्यसभेतील भाषणात पंतप्रधानांचा हल्लाबोल

Admin

पांडुरंगाचे ऑनलाईन दर्शन घ्या…. या लिंकवर

yugarambh

उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे महाराष्ट्रातील धनगर समाजासाठी गाऱ्हाणे

yugarambh

सोलापूरमध्ये लग्नावरून परत येताना भीषण अपघात, डॉक्टर दाम्पत्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू

yugarambh

Leave a Comment