December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हापरिसर

बहुजन पत्रकार संघ व रोखठोक न्यूजच्या वतीने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांना समाजभूषण पुरस्कार

लवंग (युगारंभ )-बहुजन पत्रकार संघ व रोखठोक न्यूजचा चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ अरुण भोसले यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बहुजन पत्रकार संघ व रोखठोक न्यूजच्या वतीने अध्यक्ष बंडू कांबळे व उपाध्यक्ष मकरंद साठे यांनी गुणीजन गौरव पुरस्कार सोहळा माळशिरस तालुक्यातील निसर्ग पर्यटन केंद्र खुडूस या ठिकाणी २६ एप्रिल २०२३ रोजी आयोजित केला होता.

यावेळी माळशिरसचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांचे हस्ते सोमनाथ भोसले यांचा सत्कार करून त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानपत्र देण्यात आले.

सन्मानपत्रामध्ये सोमनाथ अरुण भोसले पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष आपण बहुजन चळवळीत करीत असलेले कार्य उल्लेखनीय आहे आपण अन्यायाविरुद्ध लढा देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आपण केलेले विविध सामाजिक उपक्रम व लोकॊपयोगी व लोकाभिमुख उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन बहुजन पत्रकार संघाच्या वतीने आपणास समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा असे नमूद करण्यात आले आहे.

यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी बहुजन पत्रकार संघ व रोखठोक न्यूजच्या वर्धापन दिनास शुभेच्छा देऊन आजवर मी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मला समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल या संघाचे अध्यक्ष बंडू कांबळे व उपाध्यक्ष मकरंद साठे यांचे आभार मानून सदरच्या पुरस्काराने आणखी चांगले सामाजिक काम करण्याची ऊर्जा मिळाली असून भविष्यातही समाजासाठी आणखी चांगले कार्य करत राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष हेमंत कांबळे तालुका संघटक पांडुरंग चव्हाण उपस्थित होते.

Related posts

गृहविज्ञान महिला महाविद्यालयात वृक्षारोपणासाठी रोपांच्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न

yugarambh

मंत्री  सावंत यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकार गणेश जाधव यांचे मेल द्वारे निवेदन.

yugarambh

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळे बिस्कीट वाटप

yugarambh

अदानी विल्मरचे शेअर झाले लिस्ट, जाणून घ्या गुंतवणुकदारांना फायदा झाला की निराशा  

Admin

माळशिरस तालुक्यात लंपीच्या लसीचा काळाबाजार… पशुवैद्यकिय अधिकारी व खाजगी व्यक्तींची मिलीभगत

yugarambh

सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग,अकलूज येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा 

yugarambh

Leave a Comment