माळीनगर (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता 10 वी च्या मुलींसाठी किशोरावस्थेतील आहार,त्यावेळी होणारे शारीरिक, मानसिक व भावनिक बदल आणि त्याअनुषंगाने मुलींनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय अकलूजच्या प्राध्यापिका डॉ. सौ भारती भोसले यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी विद्यार्थिनींच्या अडचणी समजावून घेऊन त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे देत सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सुनीता वाघ,पर्यवेक्षक यशवंत माने-देशमुख,वर्गशिक्षक मुक्ताबाई मिसाळ, दिग्विजय जाधव,दीपाली राजमाने उपस्थित होते. रोहित माने यांनी सूत्रसंचालन केले तर प्रविण गोडसे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.