माळीनगर (युगारंभ )-जाधववस्ती (कोंडबावी )ता. माळशिरस जि.सोलापूर येथील शिक्षण प्रेमी नागरिक, पालक तरुण मित्रपरिवार नेहमीच वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, खाऊ वाटप असे उपक्रम राबवतात. यावेळी महाराष्ट्र दिन ही वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा सर्वांनी संकल्प केला व स्वखर्चातून लोक उठावातून शाळेच्या नावाची कमान उभारली.
फॅब्रिकेशन मध्ये कमान तयार करण्यासाठी जाधववस्तीवरील श्री.महेश साळुंखे यांनी व कलर कामासाठी पालक श्री. कल्याण भडके व शाळेचे नाव टाकण्यासाठी पेंटर श्री. लक्ष्मण धोत्रे सर यांनी मोलाचे सहकार्य केले.