December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हाराज्य

संगम येथे चक्क उन्हाळ्यात सुरु झाला धबधबा

माळीनगर -(युगारंभ )- सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचे शेतीसाठी उपयुक्त ठरणारे पाणी आता शेतकऱ्यांच्याच जीवावर उठले आहे. उजनी उजव्या कालव्यातून संगम ता.-माळशिरस येथे लाखो लिटर पाण्याची गळती सुरू झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे .

संगम येथील धबधब्याचे स्वरूप प्राप्त झालेला उजनी उजवा कालवा

या कालव्यातून गळती सुरू असलेल्या पाण्याला चक्क धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एकीकडे मंगळवेढा या ठिकाणी पाण्याची भ्रांत असताना दुसरीकडे संगम ता. माळशिरस या ठिकाणी मात्र पाणी वाया जाताना दिसत आहे. कित्येक तासानंतर याबद्दल कोणा अधिकाऱ्याला काळजी आहे किंवा प्रशासन अध्याप तिथपर्यंत पोहोचलेले नाही.

 

सोलापूर जिल्ह्याच्या कृषीक्रांतीत उजनी धरणाचे मोठे योगदान राहिले आहे.या धरणातून दोन सिंचन कालवे निघाले असून त्याद्वारे जलाशयातून सिंचन प्रक्रिया शक्य आहे. हे दोन कालवे उजव्या काठाचे मुख्य कालवे आहेत, ज्याची श्रेणी 112 किलोमीटर आहे आणि प्रति चौरस 44100 घनमीटर पाणी सोडू शकते.याच उजव्या कालव्यातून आता पाण्याचे आवर्तन सोडले आहे.

पूर्वीपासून उन्हाळ्यात एक आवर्तन सोडले जात होते. त्यानंतर अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी शेतकऱ्यांची मागणी व जिल्ह्यातील पिकांचा अभ्यास करून उन्हाळ्यात दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेतला होता.शेतकऱ्यांसाठी तो निर्णय खूपच फायदेशीर ठरला. पण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उन्हाळ्यात यंदा तीन आवर्तने देण्याचा निर्णय घेतला.

विशेष बाब म्हणजे हे तिन्ही आवर्तने सलग सोडण्याचेही स्पष्ट आदेश दिले. त्यानुसार आता १ ते २७ मार्च पहिले आवर्तन, त्यानंतर २७ मार्च ते २७ एप्रिल दुसरे आणि त्यानंतर १० मेपर्यंत तिसरे आवर्तन असणार आहे.

 

उजव्या कालव्याचे मजबुतीकरण केव्हा?-
उजनीतून पाणी सोडल्यानंतर डाव्या कॅनॉलच्या गळतीमुळे त्यातील बहुतेक पाणी वाया जात असल्याची वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील ‘सीडब्ल्यूपीआरसी’ या केंद्रीय संस्थेकडून डाव्या कालव्याचा अभ्यास केला जात आहे, परंतु उजव्या कालव्याच्या गळतीचे काय?याचे मजबुतीकरण केव्हा होणार असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत…

 

उजनी उजवा कालवा फुटून २० तास झाले त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.पाटबंधारे विभागाचे कल्याणराव भगवान माने देशमुख उपविभागीय अधिकारी कॉल उचलत नाहीत. अद्याप एक ही अधिकारी संगम या ठिकाणी पोहचला नाही या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा .उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिके होरपळून चालली आहेत आणि या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. उजनी उजवा कालव्याचे पाणी हे माळशिरस, पंढरपूर,मंगळवेढा या तालुक्याला शेतीसाठी आणि पिण्यासाठी जाते. माळशिरस तालुक्यातील संगम या ठिकाणी हा कॅनॉल फुटल्याने मंगळवेढा या ठिकाणी पाणी जाऊ शकत नाही त्यामुळे तात्काळ कॅनॉल दुरुस्त करून मंगळवेढा येतील शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे.

– गणेश इंगळे (युवा सेना जिल्हाप्रमुख)

Related posts

प्रताप क्रीडा मंडळाच्या समूह नृत्य स्पर्धेस दिमाखात प्रारंभ.. प्राथमिक गटात महर्षि प्राथमिकची बाजी.

yugarambh

प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊंचा स्मृतीदिन उत्साहात साजरा

yugarambh

माळीनगर शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आशा राजेंद्र लोखंडे यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श सेवा निवृत्त मुख्याध्यापिका पुरस्कार प्रदान.

yugarambh

पांडुरंगाचे ऑनलाईन दर्शन घ्या…. या लिंकवर

yugarambh

सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक शाळेत क्रांतीदिन उत्साहात साजरा 

yugarambh

नितेश राणेला रेबीज  इंजेक्शन द्या “- शिवसेनेचा  घोषणाबाजी करत माळशिरस येथे निषेध

yugarambh

Leave a Comment