माळीनगर (युगारंभ )-शनिवार दिनांक 6 मे 2023 रोजी श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्रशाला व ज्युनिअर कॉलेज ,नातेपुते प्रशालेमध्ये ठीक आठ वाजता राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ प्रशालेत संपन्न झाला .ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सदस्य मा. श्री. बाबाराजे देशमुख, मा. श्री. मामासाहेब पांढरे, मा. श्री. ॲड. भानुदास यशवंत राऊत, मा.श्री .महावीर मगनलाल गांधी यांचा सत्कार संपन्न झाला. याप्रसंगी स्थानिक प्रशाला समितीचे सभापती श्री. राजाभाऊ लव्हाळे, सन्माननीय सदस्य श्री.नारायण फुले, श्री. बाळासाहेब सणस, श्री. उत्कर्ष शेटे, प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक विद्यार्थी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज, सहकार महर्षी ,राजमाता आक्कासाहेब यांच्या प्रतिमांचे पूजन संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. उबाळे सर यांनी केले. अनुमोदन श्री भुजबळ सर यांनी मानले.
प्रमुख अतिथी मनोगतामध्ये मा. श्री. बाबाराजे देशमुख यांनी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले कार्य व त्यांच्या जीवन चरित्राचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आपल्या मनोगतात नमूद केले. तसेच अध्यक्ष भाषणामध्ये श्री. राजाभाऊ लव्हाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांनी आपल्या मनोगत मध्ये असे नमूद केले, की जर शिक्षकांनी सचोटीने व प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तरच विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न होईल.
तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये इयत्ता- पाचवी व आठवी स्कॉलरशिप 2023 मधील पात्र विद्यार्थी सोहम रुपनवर इयत्ता- पाचवी व प्रणव दुधाळ ,यश दराडे व स्नेहल वनवे या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत सत्कार संपन्न झाला.
तसेच विद्यालयातील प्राथमिक विभाग , माध्यमिक विभाग व उच्च माध्यमिक विभाग मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला .कार्यक्रमाचे आभार श्री गणेश नरळे सर यांनी मानले. सूत्रसंचालन श्री भाऊसाहेब वनवे सर यांनी केले. अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.