युगारंभ (माळीनगर )-माळशिरस तालुक्यात वेळापूर -माळशिरस रोडवरती खुडुस येथे शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत यांच्या नेतृत्वाखाली गाईला दुग्धाभिषेक घालून दूध दरवाढीसाठी शिवसेनेकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
यावेळी बोलताना शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत म्हणाले की शेतकरी राजा कोरोनाच्या महामारीतून कसातरी बाहेर पडतो ना पडतो तोच अतिवृष्टीमुळे संकटात आला त्यातून बाहेर पडतो ना पडतो तोपर्यंत लगेच अवकाळी पावसाने व वादळाने शेतकऱ्यांची कंबर मोडली . त्यातून कसा तरी बाहेर पडतो ना पडतो तोपर्यंत हिटलर शाही प्रमाणे वागणारे दूध संघाचे मालक यांनी दुधाचे दर कमी केले . जर आठ दिवसात दुधाचे दर जैसे थे नाही केले तर दूध संघांच्या सर्व मालकांना रस्त्यावरती फिरू देणार नाही असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत यांनी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे .
यावेळी महादेव बंडगर, सतिश कुलाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनाला केशव ठवरे, महादेव लोखंडे,बाबा पाटील,बाबासाहेब फडतरे, ब्रह्मदेव डोंबाळे, गोटू पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेस माळशिरस तालुका उपाध्यक्ष प्रतापराव मगर, वस्ताद गोरख पवार, नागनाथ मगर,भाऊसाहेब मगर, बापू कदम, पपू मिसाळ, बापु मोटे, शिवाजी हांडे, कल्याण मोटे, सचिन तरंगे,धनाजी पाटील, प्रताप ठवरे, शंकर डोंबाळे,नेताजी पाटील, शंकर कुलाळ, रोहन ठवरे, तुळशीराम ठवरे,तुकाराम बनकर, नागनाथ मगर, प्रताप पवार, संतोष मोटे, राहुल वाघमोडे, रज्जाक मुलानी,शिवाजी (पप्पू)चौगुले हे आंदोलनास उपस्थित होते व शेतकरी शिवसेना पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साहिल आतार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला पोलीस प्रशासन व शेतकरी बांधवाचे सचिन वाघमोडे यांनी आभार मानले..