अकलूज (युगारंभ )-हलदहिवडी ता. सांगोला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा फाळके यांची बिनविरोध निवड झाली असून, प्रतीक्षा सिद्धार्थ गायकवाड यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदी सुरेखा फाळके यांचा एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी माजी सरपंच विश्वनाथ चव्हाण, धनाजी चव्हाण तसेच ग्रा.प सदस्य रफिक शेख, रुक्मिणी कदम, अश्विनी येडगे, रूपाली लेंडवे, कौशल्या कुंभार, मंदाकिनी चव्हाण, आरपीआय अध्यक्ष खंडू सातपुते तसेच युवा नेते प्रभाकर चव्हाण,नितीन चव्हाण, गणेश कदम, सिद्धार्थ गायकवाड, ऋषीश्वर फाळके व अमर येडगे व लक्ष्मण लेंडवे उपस्थित होते.

अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी संगेवाडी श्री बी एन कदम यांनी काम पाहिले तर सचिव म्हणून ग्रामसेवक मंगेश पोरे यांनी काम पाहिले. यावेळी तलाठी यशोदा पंगुडवाले व कोतवाल गोपाळ भजनावळे हेही उपस्थित होते.