माळीनगर (युगारंभ )कुशल महाराष्ट्र,रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत खंडाळी (अकलूज) येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य राजेंद्र आवडे यांनी दिली.यावेळी गटनिदेशक प्रकाश मोरे व निर्देशक वर्ग उपस्थित होते.
गुरुवार,दि.1 जून 2023 रोजी (सकाळी 10 वा.) संपन्न होणाऱ्या या करिअर शिबिरात प्रख्यात वक्ते प्राध्यापक विजय नवले हे 10 वी 12 वी नंतर पुढे काय? या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी,युवक-युवती व पालकांना बदलत्या काळास अनुसरून ठिकठिकाणी सुरू झालेल्या विविध शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया व करिअर प्रदर्शनी आदींची माहिती दिली जाणार आहे.
सदर आयोजित शिबिराचे उद्घाटन विधानपरिषदेतचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात येणार असून सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन तथा संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक यतीन पारगांवकर, अप्पर तहसीलदार अजिंक्य गोडसे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुरेश भालचिम, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बागाव, सरपंच सुरेखा सुर्वे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थितीती असणार आहेत.
तरी तालुक्यातील सर्व विद्यार्थी व पालकांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य आवडे यांनी केले आहे.