December 1, 2023
yugarambh
Breaking News
खेळराष्ट्रीय

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली…

अकलूज (युगारंभ )-रोखठोक भूमिकेबद्दल प्रसिद्ध असणारे राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.. दिल्लीतील खेळाडूंचे आंदोलन यासाठी हे पत्र आहे..

    सन्मा. भारताचे पंतप्रधान @narendramodi जी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, ही नम्र विनंती.

 

प्रति,

सन्मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी.

विषय : महिला कुस्तीपटूंच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष द्यावं ही विनंती.

सस्नेह जय महाराष्ट्र.

आज तुमचं एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरं तर, लक्ष वेधून घेणं हे तेंव्हा म्हणता येईल जेव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी गाहिती नसेल तर. पण आपणांस हा विषय गाहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता ‘प्रधानसेवक’ ह्या नात्याने आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती..

ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियों’ असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक

पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत.

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय

मिळावा, आणि ह्या लढाईत कोणाच्याही ‘बाहुबला’चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवीं

आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे.

ह्या आधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली तेंव्हा असो की मुंबईतील २६/११ च्या घटनेच्या वेळेस • धाव घेतली होती.. ही तुमची सहृदयता होती आणि हीच सहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवास्थानापासून अवघ्या काही किलोमीटवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी ही जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे तशीच इच्छा/ विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे.

म्हणूनच जर त्यांना योग्य न्याय नाही मिळाला तर कुठल्या खेळाडूला स्वतःच्या रक्ताचं पाणी करून देशासाठी पदक मिळवावं असं वाटेल? आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दुःखाची पर्वा नाही असं चित्र उभं राहिलं तर ‘खेलो इंडिया’ हे स्वप्नच राहील. जर आपण खेळाडूंना देशाचा गौरव म्हणत असू तर मग त्यांची २८ मे ला ज्या पद्धतीने फरफट झाली तशी फरफट होणार नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना आश्वस्त केलं जाईल इतकं तर आपण नक्कीच कराल ह्याची मला खात्री आहे…

आपण ह्या विषयांत लक्ष घालावं आणि ह्या विषयात तोडगा काढावा ही पुन्हा एकदा विनंती.

 

Related posts

Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन रद्द होणार?

Admin

गडकरी -ठाकरे ‘राज’कीय भेट?

yugarambh

उत्तर प्रदेशसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार मोफत वीज

Admin

भारताचे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

yugarambh

सुवर्णकन्या ऋतुजा संपत भोसले यांच्या स्वागतासाठी लवंगचा युवा वर्ग पुणे येथे रवाना

yugarambh

PM Modi in Rajyasabha : PM मोदींचा राज्यसभेत विरोधकांवर निशाणा, भाषणातील प्रमुख मुद्दे…

Admin

Leave a Comment