माळीनगर (युगारंभ )-राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा स्मृतिदिन प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल बेंबळे येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव अनपट साहेब,संस्थेचे सचिव बी.बी. इंगळे सर,शाळेचे प्राचार्य प्रभाकर सर उपस्थित होते.
सौ.राऊत मॅडम यांनी प्रस्ताविकामध्ये सांगितले की एरवी पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे गायले जातात मात्र एका आईने आपल्या संस्काराच्या शिदोरीने असा पुत्र जन्माला घातला ज्यांनी हिंदूंना पुन्हा एकदाच मानाने उभा राहण्यास शिकवले अशा प्रकारे जिजाऊचा महती त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.
कु.प्राची गायकवाड या विद्यार्थिनी तिचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बी.बी इंगळे सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ राऊत मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.