माळीनगर (युगारंभ )-दि 15 जून 2023 नवीन शैक्षणिक वर्ष 2023-24 या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ च्या निमित्ताने श्री.जयसिंह मोहिते- पाटील प्राथमिक शाळा संग्रामनगर या प्रशालेमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत प्रशाला समितीचे सदस्य मा.श्री.महादेवराव अंधारे साहेब यांनी गुलाब पुष्प व खाऊ देऊन केले.
तसेच सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.फिरोज तांबोळी सर बालवाडी विभाग प्रमुख सौ.सूर्यवंशी मॅडम श्री.खंडागळे सर सौ.पवार मॅडम सौ.कदम मॅडम सर्व विद्यार्थी व बहुसंख्येने पालक उपस्थित होते.