अकलूज (युगारंभ )-दिनांक १५/०६/२०२३ वार..गुरुवार रोजी महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग यशवंतनगर येथे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात पार पडला..प्रथम मुलांचे फुले आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी प्रशालेची रांगोळी…फुले…आणि फुग्यांनी सजावट करण्यात आली होती..मुले फार आनंदात आणि उत्साहात प्रशालेत दाखल झाली होती…बहुतांश मुले शालेय गणवेशात उपस्थित होती..
प्रमुख पाहुणे आणि नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते महर्षि काका आणि अक्कासाहेब व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले..
सकाळ सत्रात..श्री.रोमन पाटील..जानराव मॅडम… सूर्यवंशी मॅडम..तसेच दुपार सत्रात..श्री.संदीप रेडेकर..सौ.रेडेकर..सौ.पाटील मॅडम यांच्या हस्ते पुस्तक वाटप करण्यात आले..
प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री.पारसे सर यांनी मुलांचे स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षासाठी मुलांना शुभेच्छा दिल्या..
जेवणाच्या सुट्टीत मुलांना गोड शालेय पोषण आहार देण्यात आला..
श्री.गायकवाड सर यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले..या प्रसंगी नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे पालक उपस्थित होते.