इंदापूर :(युगारंभ )-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने UGC अंतर्गत घेतलेल्या राज्य पात्रता परीक्षा (SET) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून इंग्रजी विषयात राहूल राजकुमार कुकडे उतीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
प्राध्यापक कुकडे हे सध्या शासकीय निवासी शाळा तरंगवाडी ता. इंदापूर येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असून समाजकल्याण विभाग पुणे यांच्यामार्फत गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानदान करण्याचे काम करीत आहेत.