माळीनगर :(युगारंभ )-शिवसेना सोलापूर संपर्कप्रमुख अनिलजी कोकीळ,युवा सेना संपर्कप्रमुख उत्तम आईवळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख गणेश दादा इंगळे,शिवसेना तालुकाप्रमुख संतोष भैया राऊत, युवा सेना उपतालुका प्रमुख दुर्वा आडके, युवा सेना तालुकाप्रमुख सुभाष काकडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रवक्ते लक्ष्मणजी हाके सर,शिवसेना माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे,शिवसेना जिल्हा समन्वयक प्राध्यापक अजय दासरी सर,शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना व युवासेना माळशिरस तालुक्याच्या वतीने नितेश राणेचा निषेध करण्यात आला.
कपडे बदलतो तसे पक्ष बदलणारे भाजपचे आमदार नितेश राणे, नारायण राणे व त्यांचे कुटुंब हे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची दलदली करतात, पक्ष बदलून, काहीही करून मंत्रीपद मिळवणे हेच त्यांचे ध्येय असते,ज्या ठाकरेंनी राणेंना मोठे केले आज त्याच ठाकरेंच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी टीका केली. ही टीका मराठी माणसाला न पटणारी आहे त्यामुळे तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत.त्यामुळे संबंध महाराष्ट्रभर नाराजीचा सुर आहे.
याच टीकेचे सोलापूर जिल्ह्यात पडसाद उमटले, माळशिरस येथे नितेश राणे चा निषेध नोंदवण्यात आला.यावेळी नितेश राणे भाजपच्या कुत्र्याला रेबीज चे इंजेक्शन द्या अश्या घोषणाबाजीने माळशिरस परिसर दुमदुमत होता.