माळीनगर :(युगारंभ )-मौजे गणेशगांव ता. माळशिरस येथील सरपंच पदाची निवड प्रक्रिया गुरूवार दि १३ जुलै रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली नुतन सरपंचपदी मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक पोपट विठोबा रूपनवर यांची बिनविरोध निवड झाली. सुरूवातीला ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कै. तुकाराम सोलनकर यांना अभिवादन करून सरपंच निवडीचा प्रस्ताव गटनेते दादासाहेब नलवडे यांनी मांडला याला सर्वानुमते मंजूरी मिळाल्यानंतर निवड प्रक्रिया करण्यात आली.

यावेळी मावळत्या सरपंच उषा ठोंबरे यांनी सदस्य व ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त केले याप्रसंगी उपसरपंच बाळासाहेब ठोकळे , सदस्या शोभा नलवडे, सदाशिव शेंडगे ,रेहाना शेख , सिताराम शेंडगे , रामचंद्र ठोंबरे , नजीर शेख , हनुमंत सोलनकर, महादेव नलवडे , कुंडलिक शेंडगे , कुंडलिक रूपनवर , संभाजी शेंडगे , वसंत ठोकळे , अहमद पठाण, बाळासाहेब रूपनवर , सदाशिव शेंडगे , गणेश ठोंबरे , आश्विनी वळकुंडे , मोनाली रूपनवर , यशवंत सोलनकर , किसन शेंडगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.