अकलूज(युगारंभ )- प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलूज यांच्यावतीने श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने रविवार दिनांक 23 जुलै 2023 रोजी भव्य राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा “रत्नाई चषक” चे आयोजन केले असल्याची माहिती प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरुपाराणी मोहिते पाटील यांनी दिली. प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप क्रीडा मंडळाने कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मंडळांनी आजपर्यंत अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकणारे कलाकार, खेळाडू, तंत्रज्ञ निर्माण केले आहेत. 
शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थी पालक व खेळाडूंना याचा लाभ घेता यावा म्हणून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर अकलूज येथे भव्य राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा दहा वर्षे वयोगट, 15 वर्षे वयोगट व खुला गट अशा तीन गटासाठी आयोजित केली आहे. वेगवेगळ्या गटासाठी वेगवेगळी परितोषिक व मेडल्स ठेवलेली आहेत. या स्पर्धेत उत्कृष्ट पालक महिला व पुरुष, सर्वात लहान खेळाडू, सर्वात ज्येष्ठ खेळाडू आणि उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू यांना रोख रक्कम व ट्रॉफी तसेच अनेक कॅश प्राईज पारितोषिके ठेवलेली आहेत. गेल्या वर्षी 250 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. देशात चेन्नई राज्यात नागपूर व आता 64 घरांचा खेळ असलेल्या बुद्धिबळाच्या पटावर राज्य करण्यासाठी अकलूज बुद्धिबळपटूंसाठी केंद्र मानले जात आहे.
-
सदरच्या स्पर्धा स्विझलिंग पद्धतीने खेळवली जाणार आहे.
-
स्पर्धेची नोंदणी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंतच केली जाणार आहे.
-
त्यानंतर एन्ट्री केल्यास दुसऱ्या राउंड पासून खेळावे लागेल.
-
स्पर्धेसाठी प्रवेश फी रुपये 100 ठेवण्यात आले आहे.
-
स्पर्धेत नाव नोंदणीसाठी दहा वर्षे वयोगटाकरीता 9960600059,
-
पंधरा वर्षे वयोगटाकरीता 8668456767 व
- खुल्या गटासाठी 8208188586 या क्रमांकावर संपर्क करून सहभाग नोंदविण्याचे आवाहन मंडळाचे सचिव श्री पोपटराव भोसले पाटील तसेच संचालक मा. श्री वसंतराव जाधवसर, श्री. यशवंत माने देशमुख सर व स्पर्धा प्रमुख बावळे सर यांनी केले.