अकलूज (युगारंभ )-चाकोरे (ता.माळशिरस) येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेला एलआयसी एजंट अर्जुन कुंभार व सागर वरकड यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे चाकोरे ग्रामपंचायतीला मिळालेल्या बिमा ग्राम पुरस्काराच्या रकमेतून चाकोरे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पाच संगणक संचाचे वाटप नुकतेच ग्रामपंचायत मार्गदर्शक राहुल बापू वाघमोडे,सरपंच नवनाथ जाधव,माजी सरपंच ॲड. चंद्रकांत शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बापूराव वाघमोडे,दादासो आरडे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यापुर्वी बीमा ग्राम योजनेतील रकमेतून जि.प. प्राथमिक शाळा प्रतापनगर व जि.प.प्राथमिक शाळा विठोबा पाटील वस्ती या शाळांना संगणक मिळाले आहेत भविष्यात या योजनेतून जि.प.प्राथमिक शाळा जावळे वस्ती व जि.प.प्राथमिक शाळा खरात वस्ती या शाळांनाही संगणक संच देण्यात येणार आहेत असे उपस्थित मान्यवरांनी आश्वासन दिले.
ग्रामीण भागातील गावांचा विकास व्हावा यासाठी एलआयसी दरवर्षी आदर्श विमा ग्राम योजना राबवते ज्या गावची लोकसंख्या दहा हजार लोकसंख्या पेक्षा कमी आहे अशी गावे यामध्ये सहभाग घेऊ शकतात.दरवर्षी एलआयसी कडून आर्थिक वर्षात ठरवून दिलेला व्यवसाय पूर्ण झाल्यास एलआयसी कडून १०००००,७५०००,५०००० असे बक्षीसांचे स्वरूपात मिळतात.आतापर्यंत चाकोरे ग्रामपंचायतला २०१८-१९ ला रु.५००००/- व २०२१-२२ ला रू.१०००००/- असे आतापर्यंत १५००००/- रूपयाचे बक्षीस देण्यात आले आहे.त्यातून गावातील जिल्हा परिषद शाळेला संगणक देण्यात आलेला आहे.इथून पुढे येणाऱ्या बक्षीसामधून गावातील मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर बनवणे तसेच सार्वजनिक ठिकाणी पाण्याची व्यवस्था,स्वच्छतागृह व्यवस्था,झाडे लावणे इत्यादी गोष्टीसाठी भविष्यात येणारा निधी वापरण्याचा मानस ग्रामपंचायतीचा आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वृंद, विद्यार्थी,पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
आमचे प्राथमिक शिक्षण चाकोरे येथील जिल्हा परिषद शाळेत झाले.त्या शाळेच्या सर्वांगीण विकास करण्याचा एलआयसीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला बक्षीस मिळालेल्या रकमेतून संगणक देताना आम्हाला खूप आनंद होत आहे.-अर्जुन कुंभार व सागर वरकड एलआयसी एजंट चाकोरे