December 1, 2023
yugarambh
Breaking News
खेळराज्य

रत्नाई चषक बुद्धिबळ स्पर्धा_२०२३ चा उदघाट्न समारंभ संपन्न 

माळीनगर (युगारंभ ) -ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाचे व्यासपीठ मिळावे. मुलांचा शारीरीक व बौध्दिक विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज १९७६ पासून ते आजतागायत सामाजिक बांधीलकीतुन विविध स्पर्धांचे, उपक्रमांचे आयोजन करत आहे. श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त  मंडळाचे संस्थापक मा.श्री.जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी ‘रत्नाई चषक’ खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन स.म.शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर येथे करण्यात आले.

  स्पर्धेचे उदघाट्न अकलूज पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मा. स्वाती सुरवसे यांच्या हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण ढवळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा प्रमुख अभिजित बावळे यांनी केले. त्यांनी मंडळाच्या स्थापनेचा उद्देश, राबविण्यात येणारे उपक्रम याबद्दल माहिती दिली.

उदघाट्न प्रसंगी प्रमुख अतिथी सुरवसे मॅडम यांनी मंडळाच्या कार्याचे व उपक्रमांचे कौतुक करीत स्पर्धेच्या युगात स्पर्धेकांनी आपला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करावा तसेच बुद्धिबळ स्पर्धेचे केंद्र अकलूज होत आहे याचा अभिमान वाटतो असे मत व्यक्त केले.

   अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. प्रविण ढवळे यांनी भविष्यातील विश्वनाथ आनंद हे या स्पर्धेच्या माध्यमातून तयार होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

    स्पर्धेची सुरुवात बाल राष्ट्रीय खेळाडू कु.अनन्या बाळापुरे, आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू तसेच माळशिरस तालुक्यातील मुलींमधील प्रथम बुद्धिबळ खेळाडू कुमारी रक्षिता जाधव यांच्यामध्ये सामना होऊन झाली. 

  या स्पर्धा १० वर्ष, १५ वर्ष व खुला गट अशा तीन वयोगटात खेळविण्यात येणार आहेत. यात उत्कृष्ट महिला व पुरुष पालक खेळाडू, सर्वात लहान व सर्वात जेष्ठ खेळाडू, उत्कृष्ट दिव्यांग खेळाडूंना रोख बक्षिसे व ट्रॉफी ठेवण्यात आली. ही स्पर्धा स्विझलिंग पद्धतीने खेळविण्यात येत आहे. ‘वयोवृद्ध खेळाडूंचा’ सहभाग ही या स्पर्धेतील विशेष बाब आहे.

स्पर्धेसाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील एकूण ४०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. तीनही वयोगटासाठी स्वतंत्र रोख बक्षिसे, चषक व मेडल अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

    सोलापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे सदस्य व स्पर्धेचे प्रमुख पंच उदय वगरे, स्पर्धाप्रमुख अभिजित बावळे, मंडळाचे सचिव पोपट भोसले पाटील, खजिनदार वसंत जाधव, संचालक मंडळ, सदस्य, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक उत्कर्ष शेटे, विविध शाखांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. बहुसंख्येने खेळाडू त्यांचे पालक, प्रेक्षक उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलाही बागवान, शकील मुलाणी यांनी केले तसेच आभारही मानले. उदघाट्न समारंभ नंतर स्पर्धेला सुरुवात झाली.

Related posts

लवंग येथे ‘आनंदाचा शिधा’ लाभार्थ्यांना वाटप

yugarambh

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहिर!

yugarambh

मराठी साहित्यक्षेत्रातील प्रसिद्ध कवी आणि लेखक नामदेव धोंडो महानोर उर्फ ना. धो. महानोर यांचं निधन

yugarambh

पुष्प 3रे -संसारा आलिया एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे – ह.भ.प. राहुल महाराज चोरमले

yugarambh

Bade Miyan Chote Miyan : ‘या’ दिवशी येणार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट

Admin

स्टार प्रवाह वरील “प्रवाह भक्तीरसाचा” या किर्तन सोहळा कार्यक्रमाचे उद्‌घाटन माजी उपमुख्यमंत्री मा.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न

yugarambh

Leave a Comment