December 1, 2023
yugarambh
Breaking News
Otherजिल्हापरिसर

श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त महर्षि संकुलात विविध कार्यक्रमांचे आयोजन

माळीनगर (युगारंभ )-  शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते- पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन ,शालेय पारितोषिक वितरण व वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

     कार्यक्रमाप्रसंगी शंकरराव माने पाटील व्हाईस चेअरमन सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना शंकरनगर, प्रशाला समिती सभापती जेष्ठ विधीज्ञ नितीनराव खराडे व लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर प्रशाला समिती सदस्य नवनाथ पांढरे यांच्या शुभहस्ते श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सविता गायकवाड यांनी केले .सर्व मान्यवरांचा सन्मान समारंभ संकुलाच्या वतीने पार पडला.

    शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका मा.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते- पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशालेतील माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी 7200 रुपयांचे एकूण 18 कुंड्या प्रशालेला भेट दिल्या. इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी *माझे आई-बाबा* हा उपक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

      संकुलातील विविध स्पर्धातील पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

       वृषाली कारमकर व साक्षी मोहिते यांनी आपल्या भाषणातून श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जीवन चरित्रावर शब्दांजली वाहिली.

       संकुलातील सहशिक्षिका प्रतिभा राजगुरू यांनी आपल्या भाषणात श्रीमती रत्नप्रभादेवी यांच्या ठायी असलेल्या उदारता व ममत्व अशा गुणांची ओळख करून दिली.

        प्रमुख अतिथी शंकरराव माने पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, आक्कासाहेब यांनी आदर्श माता, आदर्श कुटुंबप्रमुख व आदर्श महिला अशा त्रिवेणी संगमाची सांगड घालत सहकार महर्षिंना मोलाची साथ दिली.

     सर्व मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

    कार्यक्रमास प्रशाला समिती सदस्य अनिल जाधव, विनोद जाधव, नितीन इंगवले देशमुख, सुनिता टिंगरे मुख्याध्यापक शिवाजी पारसे, उप -मुख्याध्यापक भारत चंदनकर हे उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलाही बागवान यांनी केले तर आभार अंकुश एकतपुरे यांनी मानले.

Related posts

उत्तर प्रदेशसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार मोफत वीज

Admin

अकलूज येथील समावि प्राथमिक शाळेत क्रीडामहोत्सव उत्साहात संपन्न

yugarambh

भिमजयंती मोठया उत्साहाने लवंग (भिलारे वस्ती )येथे साजरी

yugarambh

अकलूज शहर बुरूड समाज व युवा मंच,अकलूज यांच्याकडून तिरंगा रॅलीचे आयोजन

yugarambh

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून पुरवणी अर्थसंकल्पात माळशिरस तालुक्यासाठी १७.५० कोटींचा निधी

yugarambh

गृहविज्ञान महिला महाविद्यालय ‘स्पोकन इंग्लिश’ विषयावर कार्यशाळा संपन्न

yugarambh

Leave a Comment