माळीनगर (युगारंभ )-दिनांक 25 जुलै 2023 रोजी श्री.जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय संग्रामनगर प्रशालेमध्ये श्रीमती.रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील उर्फ आक्कासाहेब यांच्या 98 व्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या निमित्त प्रशालेमध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष – प्रशाला समिती सदस्य महादेवराव अंधारे साहेब होते तसेच प्रमुख अतिथी सुनीता ठोंबरे मॅडम उपस्थित होत्या.
प्रथम स्व.आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले नंतर स्व. आक्कासाहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दुग्ध शर्करा योग म्हणजे आक्कासाहेब यांची जयंती व स्वरूपाराणी जयसिंह मोहिते- पाटील तथा दिदीसाहेब यांचा वाढदिवस हा एकाच दिवशी असतो म्हणून संस्थेच्या संचालिका व प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील तथा दिदीसाहेब यांना प्रशालेच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच प्रशाला समिती सदस्य महादेवराव अंधारे साहेब यांचा देखील वाढदिवस असल्याने त्यांना देखील प्रशालेच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रशालेमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
ठोंबरे मॅडम यांनी आपल्या भाषणांमध्ये आक्कासाहेबांनी माळशिरस तालुक्याला मायेचा ओलावा बहाल केला असे सांगितले तसेच झोपडीतल्या संसाराची त्यांनी कधी लाज बाळगली नाही आणि श्रीमंती आली म्हणून कधी गर्व केला नाही हे संस्कार त्यांनी हक्काने आपल्या मुलांच्या वरती केले म्हणून भरभराटीच्या काळात सुद्धा सगळ्या मुलांचे पाय जमिनीवरती आहेत असे त्यांनी आपल्या भाषणातून आक्का साहेबा विषयी विचार व्यक्त केले.
आक्कासाहेब यांच्या जयंतीनिमित्त व मा. दिदीसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना महादेवराव अंधारे साहेब यांच्या तर्फे खाऊ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रशाला समितीचे सदस्य महादेवराव अंधारे साहेब तसेच सुनिता ठोंबरे मॅडम, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक घुले सर,तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक फिरोज तांबोळी सर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सूर्यवंशी मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.