लवंग (युगारंभ )-शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख मा.श्री. उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या ६३व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अकलूज शहर यांचेवतीने भव्य नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके सर, शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी राजे शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले .शिवसेना तालुकाप्रमुख संतोष भैय्या राऊत व शिवसेना अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे यांच्या नेतृत्वाखाली अकलूज येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी या शिबिरास अकलूज शहर व परीसरातुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
६६३लाभार्थ्यांनी या शिबीराचा लाभ घेतला,या पैकी ४२ रुग्णांची मोतीबिंदू ची शस्त्रक्रिया होणार आहे आणि २० रूग्णांना चष्मे वाटप करण्यात येणार आहेत.