पुणे (युगारंभ )-मराठी साहित्यक्षेत्रातील प्रसिद्ध कवी आणि लेखक नामदेव धोंडो महानोर उर्फ ना. धो. महानोर यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. महानोर हे ८१ वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी पळसखेड या मूळ गावी ना. धो. महानोर यांच्यावर अंत्यंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मराठी कवी नामदेव धोंडो महानोर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळं त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतु त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाला निरोप दिला. औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील पळसखेडा या मूळ गावी नामदेव धोंडो महानोर यांच्यावर उद्या संध्याकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
महानोर हे रानकवी म्हणून प्रसिद्ध होते. पानझड, ‘तिची कहाणी’ आणि ‘रानातल्या कविता’ या कवितासंग्रहातून त्यांनी मराठवाड्यातील लोकगीतं प्रसिद्ध केली होती.