अकलूज – शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित,सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग, अकलूज प्रशालेत ऑगस्ट क्रांतीदिन साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम उपस्थित होत्या.तसेच सर्व इयत्ता प्रमुख उपस्थित होते.प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मगर मॅडम यांनी केले.
तद्नंतर प्रशालेतील विद्यार्थी पृथ्वीराज कांबळे,अंतरा कदम,अझीन फकीर,सिनिन शेख,दत्तराज बारबोले या बालचमुंनी आपले विचार मांडले.तसेच प्रशालेतील सहशिक्षक श्री.सोमनाथ बाजारे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ‘मेरी मिट्टी -मेरा देश ‘ मोहिमेंतर्गत प्रतिज्ञा घेण्यात आली.यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थी ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिज्ञा घेतली.

यावेळी सर्व विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मगर मॅडम यांनी केले.