माळीनगर (युगारंभ )-सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक शाळा,अकलूज प्रशालेत आज दिनांक – १५ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी अकलूज पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.मनोज पवार साहेब उपस्थित होते.तसेच श्री.समीर पठाण साहेब, श्री.पांडुरंग जाधव साहेब उपस्थित होते. तसेच प्रशाला समितीच्या सदस्या सौ.कुलकर्णी वहिनी, सौ.जावळे वहिनी,प्रशालेच्या मुख्याध्यापिका कु.शेख मॅडम उपस्थित होत्या.
प्रथमतः सन्माननीय प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.ध्वजारोहण झाल्यानंतर प्रशालेतील आनंदयात्री बालवाद्यवृंदातील विद्यार्थी कलाकारांनी आपल्या मधुर आवाजात राष्ट्रगीत,ध्वजगीत, राज्यगीत गायन केले.त्यानंतर ‘मेरी मिट्ठी मेरा देश पंचप्राण’ शपथ घेण्यात आली.त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी संचलनाचे शिस्तबद्ध सादरीकरण केले.तद्नंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी कवायतीचे सुंदर असे प्रात्यक्षिक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका कु.शेख मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री.मनोज पवार साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले.साहेबांनी उपस्थित सर्वांना बहुमोल मार्गदर्शन केले व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
“शरीर माध्यम खलू धर्म साधनंम” या उक्तीप्रमाणे निरोगी शरीरात निरोगी मन वास करते.प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मानवी मनोऱ्याचे (पिरॅमिड चे) सादरीकरण केले.निरोगी शरीरासाठी व्यायामाची गरज आहे हा संदेश त्यांनी यातुन दिला.त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थी कलाकारांनी आपला नृत्याविष्कार सादर करुन सर्वांची मने जिंकली.विद्यार्थी कलाकारांनी आपल्या नृत्यामधून सर्वधर्म समभाव व एकात्मतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गिरीश सुर्यवंशी सर यांनी केले.शेवटी सारे जहाँ से अच्छा या समुहगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.