अकलूज (युगारंभ )-श्री .जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय व प्राथमिक विभाग संग्रामनगर प्रशालेमध्ये 77 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशाला समितीच्या सभापती निशा गिरमे मॅडम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच, प्रशाला समिती सदस्य महादेवराव अंधारे साहेब व निवृत्त पोलीस निरीक्षक दळवी साहेब हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते.
प्रथम अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी तिरंगी ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत, झेंडा गीत व राज्य गीताचे सामुदायिक गायन केले. त्यानंतर मेरी मिट्टी मेरा देश या अभियाना अंतर्गत सर्वांनी पंचप्राण शपथ घेऊन देशाविषयी अभिमान जागृत केला. तसेच पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून देशाविषयी प्रेम व आदर व्यक्त केला.पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील वैयक्तिक गीतांनी तसेच माध्यमिक विभागातील कलाकारांनी अतिशय उत्कृष्ट व सुंदर असे देशभक्तीपर गीत सादर करून सर्वांची मने जिंकली
या कार्यक्रमाच्याप्रसंगी प्रशाला समितीच्या सभापती निशा गिरमे मॅडम तसेच प्रशाला समिती सदस्य महादेवराव अंधारे साहेब तसेच निवृत्त पोलीस निरीक्षक दळवी साहेब माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एम.बी.घुले सर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक फिरोज तांबोळी सर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सूर्यवंशी मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व बहुसंख्येने पालक उपस्थित होते.