December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हापरिसर

महर्षि संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

माळीनगर (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ ,अकलूज संचलित महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला. स्वातंत्र्यदिनानिमित्त योगासने, मानवी मनोरे ,सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाने स्वातंत्र्य दिनाला सुरेखतेची झालर लागली.

       कार्यक्रमाप्रसंगी डॉ. सई भोरे -पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज व अभिजीत रणवरे सचिव, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज ,अॅड. नितीनराव खराडे सभापती प्रशाला समिती यशवंतनगर , जगताप,संजय गळीतकर मुख्याध्यापक महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला,यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीत म्हणून ध्वजाला मानवंदना देण्यात आली.

    संकुलातील स्काऊट व गाईड पथकांनी ध्वजाला मानवंदना दिली होती. योगासनाचे प्रात्यक्षिक सादर करत योग विद्यार्थ्यांनी सर्व प्रेक्षकांची मने जिंकून घेतली .मानवी मनोऱ्याचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी याप्रसंगी केले.

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तीनही प्रशालेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्याविष्कार सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली . प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या देशभक्तीपर काव्यवाचन स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.

      संकुलातील विद्यार्थी अल्फीया सय्यद ,रुद्र घाडगे ,वैभवी गोडसे ,गुंजन कारमकर, वृषाली कारमकर यांच्या भाषणातून देशाविषयी असणाऱ्या आदर भावना व्यक्त झाल्या.

      कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अभिजीत रणवरे सचिव ,शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांनी आपल्या भाषणात सांगितले की ,आपल्या भारत देशाचा जाज्वल्य इतिहास आपण मनात साठवून ठेवला पाहिजे व त्याचे जतन केले पाहिजे.

       कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर सई भोरे- पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज यांनी आपल्या भाषणातून सर्व विद्यार्थी व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता सारे जहाँ से अच्छा या समूहगीताने झाली.

      कार्यक्रमाप्रसंगी प्रशाला समिती सदस्य नवनाथ पांढरे ,कैलास चौधरी, विनोद जाधव ,नितीन इंगवले देशमुख, अनिल जाधव , मुख्याध्यापक शिवाजी पारसे ,सविता गायकवाड सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी व प्रतिभा राजगुरू यांनी केले.

Related posts

सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागात फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात पार पडल्या

yugarambh

लवंग येथे कष्टकरी महिलांचा सन्मान करून महिला दिन साजरा

yugarambh

जिजामाता कन्या प्रशालेच्या १५०० मुलींनी केले संविधानाचे वाचन

yugarambh

वाघोली ग्रामपंचायतीवर खंडोबा ग्रामविकास परिवर्तन गटाचे वर्चस्व

yugarambh

गाईला दुग्धाभिषेक घालून दूध दरवाढीसाठी शिवसेनेकडून अनोखे आंदोलन : संतोष राऊत

yugarambh

पीपल्स रिपब्लिकन पार्टी व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या प्रांत कार्यालयासमोर हालगीनादसह बोंबाबोंब आंदोलन

yugarambh

Leave a Comment