सांगोला (युगारंभ )-माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचालित उत्कर्ष विद्यालय सांगोला या उपक्रमशिल शाळेत 77 वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेत जिल्ह्यात तिसावा व विद्यालय प्रथम आलेल्या चि समर्थ शिंदे च्या हस्ते आजच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण करण्यात आले. 
यानंतर इयत्ता नववी मधील स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी बँडच्या तालावर मार्चिंग सादर केले. तसेच पूर्व प्राथमिक व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली. यानंतर पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर नृत्य सादरीकरण व विद्यालयात सुरू असलेल्या मुलींसाठीच्या मोफत लाठी-काठी प्रशिक्षणाचे सादरीकरण झाले. क्रांती दिनाच्या निमित्ताने नऊ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेतील इयत्तावार विजेत्यांनी कथाकथन सादर केले.
तत्पूर्वी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील कुलकर्णी सर यांनी शाळेमध्ये राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थित सर्वांना दिली. त्याचबरोबर अर्चना कांबळे मॅडम यांनी मातृ प्रबोधन वर्गाविषयीची माहिती सांगत मातृ प्रबोधन वर्गास येण्याचे आवाहन केले.
आजच्या शुभ दिनाचे औचित्य साधून श्री. पाटणे या पालकांनी विद्यालयास आपल्या नर्सरीतील रोपांची भेट दिली.
या प्रसंगी उपस्थित संस्था अध्यक्षा मा. डॉ संजीवनीताई केळकर, कोषाध्यक्षा डॉ शालिनीताई कुलकर्णी, शाळा विभाग प्रमुख प्रा.नीलिमाताई खर्डीकर, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी त्यांचे तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे खूप खूप कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुलाणी मॅडम यांनी केले. खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.