December 1, 2023
yugarambh
Breaking News
खेळराज्य

प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज आयोजित भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न

अकलूज (युगारंभ )-प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज च्या वतीने ‘भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे’ आयोजन रविवार दि. २०/०८/२०२३ रोजी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल,अकलूज याठिकाणी करण्यात आले होते . सोलापूर जिल्ह्यासह मुंबई, उस्मानाबाद या भागातील एकूण ८० संघांचा सहभाग असलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, मा. श्री दिपकराव खराडे-पाटील, महादेव अंधारे, लक्ष्मण आसबे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

  स्पर्धेदरम्यान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री.विजयसिंह मोहिते-पाटील, मंडळाचे संस्थापक मा. श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्री. मदनसिंह मोहिते-पाटील, अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, सूत गिरणीचे चेअरमन भीमराव काळे या मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढविला व प्रेक्षणीय सामन्यांचा आनंद लुटला.

   सकाळी ११ वाजल्यापासून सुरू असलेल्या स्पर्धा रात्री १२.४५ पर्यंत सुरू होत्या. अंतिम सामना चंद्रकांत सत्रे आट्यापाट्या संघ, नांदोरे व जय बिरोबा, कचरेवाडी या संघात झाला.

अत्यंत रोमहर्षक व चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात चंद्रकांत सत्रे आट्यापाट्या संघ, नांदोरे या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला त्यांना रु. ४४०००/- व आकर्षक चषक प्रदान करण्यात आले.

उपविजेता जय बिरोबा, कचरेवाडी या संघास द्वितीय क्रमांकाचे रु. ३३०००/-

तृतीय क्रमांक जय हनुमान, कौठाळी-ब या संघास रु. २२०००/- तर चतुर्थ क्रमांक पै. नितीनभाऊ घंटे, शिरढोण यांना रु. ११०००/- चे बक्षिसे मिळाली.

तसेच उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेले छत्रपती(पेहे), काशिलिंग (धायटी), सुदर्शन(तिसंगी) शंकरराव भुसणर(१५ सेक्शन) यांना प्रत्येकी ५००० रु. चे बक्षीसे देण्यात आली.

स्पर्धेचे समालोचन ए. एम अडसूळ, बापूसाहेब लोकरे यांनी तर सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी, पोपट पवार, जाकीर सय्यद, दत्तात्रय मगर यांनी केले. स्पर्धेतील पंच म्हणून कामकाज पाहिलेल्या ६४ जणांचा, आरोग्य सेवकांचा, सुरक्षा रक्षकांचा मंडळाचे वतीने सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, खेळाडू, प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मंडळाच्या पदाधिकारी, सर्व सभासदांचे कौतुक केले.

Related posts

अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी गुजरात न्यायालयाचा मोठा निर्णय, 49 जण दोषी तर 28 जण निर्दोष

Admin

शिक्षण संचालनालयाकडून योजनांचा ‘जागर’!…..कालबद्ध नियोजनातून राज्यभर अंमलबजावणी

yugarambh

पांडुरंगाचे ऑनलाईन दर्शन घ्या…. या लिंकवर

yugarambh

शासकीय निवासी शाळेतील शिक्षक राहुल कुकडे राज्य पात्रता परीक्षेत उत्तीर्ण

yugarambh

पुरूष वंध्यत्व अन् आयुर्वेद-डॉ.हर्षवर्धन गायकवाड

yugarambh

लाल_मातीतला थरार..! 2023 महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे…

yugarambh

Leave a Comment