December 7, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हा

जिल्हा परिषद लवंग शाळेत दीड लाख रुपयांचा रोख शैक्षणिक उठाव

  लवंग (युगारंभ )- जिल्हा परिषद शाळा गुणवत्ता, पट व भौतिक सुविधा यामुळे नेहमीच चर्चेत असतात .गुणवंत विद्यार्थी व होतकरू पालक यांनी या शाळाकडे नेहमी पाठ फिरवली आहे. परंतु लवंग ता. माळशिरस या गावातील गावाकऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात नवा आदर्श घालून दिला आहे   .या शाळेत तब्ब्ल दीड लाख रुपयांचा रोख शैक्षणिक उठाव करण्यात आला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन जि. प. प्राथ. लवंग शाळेत 96000 रुपयांच्या 16 सायकली गावकऱ्यांनी दिल्या, 7000 रुपयांच्या खुर्च्या, 28000 रुपयाची विद्यार्थी बक्षिसे, 11000रुपयांची ग्रंथालयास पुस्तके,10,000 रुपयांची लाल माती अशाप्रकारे 152000 चा शैक्षणिक उठाव करण्यात आला.

     यामध्ये सज्जन दुरापे -41000 रु , बिभीषण भोसले 40,000 रु, निशांत दादा पाटील 25000रुपये, प्रशांत पाटील 10,000 रुपये, मधुकर वाघ 10,000रुपये, सदाशिव अवताडे 6000 रुपये व इतर काही मिळून 152000 रुपये जमा झालेआणि या रकमेचा सदुपयोग करून गावकरी , शिक्षक व शिक्षण अधिकारी यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.असा आदर्श प्रत्येक गावाने निर्माण करावा शाळेच्या गरजांकडे दुर्लक्ष न करता अवश्यक साधानसामग्री गावकरी वर्गणीतून भागवत आहेत. अशाच प्रकारची वर्गणी सांगली पुरग्रस्ताना रिलीफ फंडात शाळेने गावाच्या मदतीने केली होती.

    याकामी शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय लोखंडे सर यांनी परिश्रम घेतले. याकामी गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. लवंग गावातील गावाकऱ्यांचे व शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related posts

माळशिरस तालुक्यात लंपीच्या लसीचा काळाबाजार… पशुवैद्यकिय अधिकारी व खाजगी व्यक्तींची मिलीभगत

yugarambh

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच कला,क्रीडा,सांस्कृतिक विकासाकडे लक्ष द्यावे – स्वरूपाराणी मोहिते-पाटील

yugarambh

बाभुळगाव येथे तरुणांनी केले वृक्षारोपण

yugarambh

म.फुले व डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त माळीनगर येथे भारतीय संविधान पुस्तिकेचे वाटप.

yugarambh

विदयार्थ्यांनी मोबाईलचा वापर टाळत, दररोज अभ्यास करावा.-डॉ.शैलजा गुजर

yugarambh

वाघोली ग्रामपंचायतीवर खंडोबा ग्रामविकास परिवर्तन गटाचे वर्चस्व

yugarambh

Leave a Comment