December 7, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हापरिसर

सोलापूर जिल्ह्यात चारा डेपो चालू करा युवा सेनेची मागणी.अन्यथा उग्र आंदोलन -गणेश इंगळे

लवंग (युगारंभ )-सोलापूर जिल्हात चारा डेपो चालू करण्यासाठी प्रा लक्ष्मण हाके सर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे व युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पिलीव येथील सुळेवाडी या ठिकाणी आंदोलन करण्यात आले यावेळी माळशिरस तालुक्यातील पिलीव , सुळेवाडी , कारखेल , जळभावी, गोरडवाडी, गारवाड इत्यादी भागातील टंचाईग्रस्त वाड्या वस्त्यावरती जाऊन शेतकऱ्यांना मेंढपाळांना भेटी देण्यात आल्या.

शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी  शेतकरी, मेंढपाळ बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. चालू हंगामात या भागात पाऊस पडला नसल्यामुळे या भागातील शेतकरी मेंढपाळ अडचणीत आला असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, शासनाने यात त्वरित लक्ष घालावे चारा डेपो सुरू करावेत, पिण्याच्या पाण्यासाठी त्वरित टँकर सुरू करावेत, वन विभागाकडून मेंढपाळांना चराईसाठी परवानगी मिळावी, पावसाअभावी करपून गेलेली खरीपातील सर्व पिके धनधान्य यांना सरसकट विमा मिळावा यासाठी शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

    येत्या आठवड्यात जर चारा डेपो चालू झाले नाहीत आणि सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने , युवा सेनेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात उग्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला.

   यावेळी बोलताना युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे म्हणाले कीसोलापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार जनतेच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. हे सर्व आमदार खासदार टेंडर -कमिशन यामध्ये गुंतल्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही,असेही ते म्हणाले.यावेळी काही मेंढपाळ शेतकरी या लक्षवेधी आंदोलनात सामील झाले.

यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे,शिवसेना तालुकाप्रमुख संतोष राऊत, युवा सेना तालुकाप्रमुख सुभाष काकडे ,युवासेना उपतालुकाप्रमुख डॉक्टर निलेश कांबळे, दत्तात्रय साळुंखे, दुर्वा आडके, संदीप भैया कदम,शिवसेना शहर प्रमुख योगेश देशमुख, युवा सेना शहर प्रमुख देवा लोखंडे, उमाजी बोडरे, ऍड. ओम कालेकर, ज्ञानदेव लेंगरे, निशांत दोलताडे, रामचंद्र सुळे, प्रवीण माने ,बंडू नरळे, जीवन लोखंडे , सुनील मिसाळ, अजय नाईकनवरे , अर्जुन लोखंडे,विकास भोई, गणेश काळे, सागर साळुंखे, शुभम भोई इ. युवा सैनिक- शिवसैनिक या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related posts

अकलूज येथे बुध्द महोत्सवाचे आयोजन

yugarambh

विदयार्थ्यांनी मोबाईलचा वापर टाळत, दररोज अभ्यास करावा.-डॉ.शैलजा गुजर

yugarambh

माळशिरस पंचायत समितीच्या 22 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर

yugarambh

चाकोरे शाळेत नवरात्रानिमित्त भोंडल्याचा कार्यक्रम संपन्न

yugarambh

खंडाळी येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन

yugarambh

अकलूज शहर बुरूड समाज व युवा मंच,अकलूज यांच्याकडून तिरंगा रॅलीचे आयोजन

yugarambh

Leave a Comment