अकलूज (युगारंभ )-मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळावे. अशी आग्रही भूमिका घेऊन अनेक बांधव ठिकठिकाणी आंदोलन करीत आहेत. मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्ता असून सुद्धा आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने पुढील शिक्षण घेता येत नाही. तसेच नोकरी देखील मिळत नाही.गेल्या कित्येक वर्षापासून मराठा समाज लोकशाही च्या मुख्य प्रवाहात नसून,23मार्च 1994रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या जी. आर. मुळे मराठा आरक्षण संदर्भात आजही संघर्ष सुरु आहे. शासनाने त्वरित तो जी. आर. रद्द करून मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळावे. अशी मागणी सर्वत्र होत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धे साठी खालीलप्रमाणे विषय आहेत –
1)-मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण
2). मराठा समाज : जात व वास्तव
3) मराठा समाज जातीलढयाचा अंत करेल का?
4). मराठा समाजातील कतृत्ववान महिलांचा इतिहास
5) . मराठा समाज व उद्योजकता
6). शेती माती व मराठा
7) मराठा समाज काल, आज आणि उद्या
8) मराठा समाजाला आरक्षणाची गरज
9)मराठा समाजाची दयनीय अवस्था सुधारण्यासाठी आरक्षणाची गरज
10)मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता
11) मराठा समाज खरेच समृध्द आहे का?
- महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी व
- 18वर्षे पूर्ण असलेला कोणताही व्यक्ती या स्पर्धेत भाग घेऊ शकतो.
- स्पर्धकांनी कोणत्याही एका विषयावर किमान एक हजार शब्द ते पाच हजार शब्द पर्यंत निबंध टाईप करून
- गणेश जाधव -7841847458. विनोद थिटे -97675 58828. अभिजित बाबर -7507655055. रणजित चव्हाण -8668516474. या नंबर वर
- 15सप्टेंबर 2023 पूर्वी पाठवावा.
- परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
सदर स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक साठी रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल.तसेच उत्तेजनार्थ म्हणून 25स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाईल.
बक्षीसपात्र व निवडक निबंध प्रकाशित केले जातील.
सदर स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन संयोजक गणेश लक्ष्मण जाधव यांनी केले आहे.