अकलूज – शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित – महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग यशवंतनगर ता. माळशिरस येथील 2 शिक्षकांना राष्ट्रनिर्माण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
यामध्ये सहशिक्षक महादेव बापू राजगुरू यांना इनरव्हील क्लब अकलूज यांच्या वतीने राष्ट्रनिर्माण पुरस्कार सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील व अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे व इनरव्हील क्लब अकलूजच्या अध्यक्षा डॉ. श्रद्धा जवंजाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महादेव राजगुरू सर यांची सेवा २७ वर्षे झाली आहे.त्यांनी कोंडबावी या गावात 300 चिंचेची झाडे लागवड करून जतन केली आहेत. कब बुलबुल पथक चालवणे या माध्यमातून ६ विद्यार्थी सुवर्णबाण करून दिल्ली येथे त्यांचे सादरीकरण केले आहे.तसेच दुष्काळाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून जनावरांना चारा गोळा करून छावणीला देणे,वारकरी अन्नदान करणे,असे विविध उपक्रम राबविले आहेत. कोविड काळात महाळुंग केंद्रातील 13 शाळेतील सर्व विदयार्थ्यांना वाफेच्या मशीन भेट देण्यात आल्या होत्या.शालेय स्तरावर गरजू व होतकरू विदयार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करीत गरीब विद्यार्थी दत्तक घेऊन त्याच्या शालेय शिक्षणाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी पार पाडली आहे.
त्याचप्रमाणे प्रशालेतील आकाश दत्तात्रय कदम यांना रोटरी क्लब ऑफ सराटी डिलाईट यांच्यावतीने राष्ट्रनिर्माण पुरस्कार पुण्याच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके यांच्या शुभहस्ते, अध्यक्ष अनिल जाधव, विलास शिंदे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
आकाश कदम सर यांची आत्तापर्यंत 12 वर्षे सेवा झाली आहे. त्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना सहभागी करून यशस्वी केले आहे. मंथन, सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन, पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, एम टी एस परीक्षा अशा स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांचे विद्यार्थी जिल्हा व राज्यस्तरावर यशस्वी झाले आहेत. त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, राज्यस्तरीय लेझीम स्पर्धा,समुहनृत्य स्पर्धामध्ये प्रथम क्रमांकाचे स्थान आपल्या विद्यार्थ्यांना मिळवून दिले आहे.आपल्या शैक्षणिक जीवनात नावीन्यपूर्ण प्रयोग करणे व उपक्रम राबविणे याची आवड कदम सर यांना आहे.
या पुरस्काराबद्दल राजगुरू सर व कदम सर यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, संचालिका व सभापती स्वरूपाराणी मोहिते-पाटील , सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, मुख्याध्यापक शिवाजी पारसे यांचे वतीने अभिनंदन करण्यात आले. प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याबद्दल या दोहो शिक्षकांचे प्रशाला सदस्य, शिक्षक -पालक यासह सर्व स्तरातून कौतूक होत आहे.