अकलूज (युगारंभ )-सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक शाळा, अकलूज प्रशालेत आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.देशमुख मॅडम यांनी केले व अनुमोदन श्री.बाळासाहेब पवार सर यांनी दिले.यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका कु.शेख मॅडम उपस्थित होत्या.तसेच सर्व इयत्ता प्रमुख व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर प्रशालेतील संगीत विभागाने “रघुपती राघव राजाराम” हे भजन सादर केले.सर्व विद्यार्थी,शिक्षकांनी देखील भजन गायन केले. प्रशालेतील विद्यार्थी चि.दर्शन बोंडगे व कु.सदफ शेख (मोठा गट) यांनी आपले बहुमूल्य विचार व्यक्त केले.तसेच महात्मा गांधींच्या वेशभूषेत आलेला विद्यार्थी चि.निरंजन पवार याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आपले विचार मांडले.तसेच प्रशालेतील शिक्षक श्री.सलमपुरे सर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आदिनाथ जाधव सर यांनी केले व आभार कु.उपाध्ये मॅडम यांनी मानले.