माळीनगर (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर, शालेय बास्केटबॉल मुलीच्या संघाने दिमाखदार खेळ करत जिल्ह्य़ात प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. जिल्हा स्तरीय सामने विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुल अकलूज येथे भरविण्यात आले होते. प्रशालेच्या मुलीच्या संघाने 17 वर्ष वयोगटात विजय संपादन केला.
बास्केटबॉल संघात सलोनी गायकवाड, आर्या कुंभार, दिव्या टेकाळे, श्रावणी रणवरे, प्रगती कुंभार, वैष्णवी डावकरे, राजनंदनी क्षीरसागर, रोशनी मेहेडा, राधिका लोंढे, संस्कृती जाधव, हर्षदा गायकवाड विद्यार्थिनींचा सहभाग होता .
बास्केटबॉल संघाला अनिल जाधव, क्रिडा शिक्षक अनिल मोहिते, मनोज सरवदे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. सर्व खेळाडू व मार्गदर्शक याचे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, प्रताप क्रिडा मंडळ अकलूज च्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील, संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे, प्रशालेचे सभापती अँड.नितीन खराडे, मुख्याध्यापक संजय गळीतकर, प्रशाला समिती सदस्य कैलास चौधरी, विनोद जाधव, नितीन इंगवले देशमुख, पर्यवेक्षक अंकुश एकतपूरे प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक याच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.