लवंग (युगारंभ )-नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सातव्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळाले. रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिसमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरलेय. टेनिसमधील हे पहिले सुवर्णपदक होय. भारताचे हे एकूण नववे सुवर्णपदक आहे. रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय.
यामधील ऋतुजा संपत भोसले ही सुवर्ण कन्या लवंग ता. माळशिरस जि.-सोलापूर या मूळ गावची रहिवासी आहे.साहजिकच गावातील नव्हे संपूर्ण भारतातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा असा हा क्षण. संपूर्ण देशभरातून ऋतुजा भोसले या सुवर्णकन्येचे कौतुक होत असताना, तिच्या गावचे युवक शांत कसे बसतील.
आज ऋतुजाचे आगमन पुणे या शहरात होणार आहे हे समजताच लवंग मधील अनेक युवक तिच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर सज्ज झाले आहेत.या युवकांचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे… व त्यांचे कौतुक होत आहे.
रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले या जोडीने भारताला नववे गोल्ड मिळवून दिले. भारताच्या पदकांची संख्या 35 वर पोहचली आहे. त्यामध्ये 9 सुवर्ण, 13 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे.