November 28, 2023
yugarambh
Breaking News
खेळपरिसरराज्य

टेनिस सुवर्णपदक विजेती ऋतुजा भोसलेचे लवंगकरांनी केले पुणे येथे जंगी स्वागत

लवंग (युगारंभ )-अहमदनगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपतराव ज्ञानोबा भोसले व निता संपतराव भोसले यांची कन्या ऋतुजा हिने चीनमध्ये झालेल्या आशियाई टेनिस क्रीडा स्पर्धेतील मिश्र दुहेरी गटात भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला आहे. लवंग ग्रामस्थांच्या वतीने पुणे एअरपोर्टवर टेनिसपटू ऋतुजा भोसले या सुवर्णकन्येचे उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले.

   माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात केवळ ६,००० लोकसंख्या असणाऱ्या छोट्याशा गावातील ही सुवर्णकन्या. ऋतुजा हिला लहानपणापासून टेनिस खेळाविषयीं आवड होती वडील पोलीस सेवेत कार्यरत आहेत.तेही कॉलेज विश्वात भालाफेक चे राष्ट्रीय खेळाडू होते. वडिलांकडून मिळालेला खेळाचा वारसा तिने जपला आणि आपल्या माता पित्याचे स्वप्न पूर्ण केले.

       ऋतुजा मुळे गावची शान वाढली आहे याचा अभिमान ग्रामस्थांना, माळशिरस तालुक्याला, सोलापुर जिल्ह्याला, महाराष्ट्राला आणि सपुंर्ण भारत देशालाच तिचा सार्थ अभिमान वाटत आहे. जगभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंचक्रोशीत जागोजागी तिचे बॅनर्स लावून कौतुकाचा अभिमानाचा, आनंदाचा वर्षाव ग्रामस्थ करताना दिसत आहेत.

 

वडिलांच्या गळ्यात सुवर्णपदक-

पुणे एअरपोर्टवर येताच सनई- चौघडे, ढोल- ताशाच्या गजरात ऋतुजाचे स्वागत ग्रामस्थानी केले. देशाची शान तिरंगा ध्वज तिच्या खांद्यावर लपेटताच आपल्या दोन्ही हातानी ध्वज सांभाळीत ती वडिलांच्या दिशेने आली आणि आपल्या गळ्यातील सुवर्णपदक जन्मदात्याच्या गळ्यात घालताच पितापुत्रीची गळाभेट झाली. कर्तव्यदक्ष डी वाय एस पी असणाऱ्या पित्याच्या डोळ्यातून आनंदाश्रूचा झरा वाहु लागताच ग्रामस्थ व उपस्थितांचेही डोळे पाणावले.लवंगच्या वतीने नागरी सन्मान-

ग्रामस्थांच्या आनंदाला तर सीमा राहिली नाही. आमच्या लवंगची सुवर्णकन्या जगात भारी म्हणून गर्वाने छाती फुगवून गावकरी तिचे कौतुक करीत आहेत.देशाचा अभिमान असणारी सुवर्णकन्या ऋतुजा भोसले हिचा नागरी सन्मान लवंगकरांच्या वतीने करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच सराटी पूल येथून ते लवंग गाव इथपर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार असून, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ऋतुजा हिचा सन्मान 25/4 येथे लवंगकरांच्या वतीने करण्यात येणार आहे.-विक्रम भोसले (पोलीस पाटील, लवंग )

Related posts

किती महागले गहू, तांदूळ? गेल्या पाच वर्षातील दरवाढीची केंद्राने दिली माहिती

Admin

चिमुकल्यांच्या नृत्यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद… महर्षि महोत्सवास प्रेक्षकांची अलोट गर्दी

yugarambh

सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग,अकलूज येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

yugarambh

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने ‘परंडा भुईकोट किल्ल्याची ‘ स्वच्छता मोहिम.

yugarambh

श्री.जयसिंह मोहिते-पाटील प्राथमिक शाळा संग्रामनगरमध्ये दहीहंडी व हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन

yugarambh

सोलापूर जिल्ह्यात चारा डेपो चालू करा युवा सेनेची मागणी.अन्यथा उग्र आंदोलन -गणेश इंगळे

yugarambh

Leave a Comment