माळीनगर -महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना बुरशी नाशक कसे वापरावे याचे प्रात्यक्षिक माळीनगर येथील शेतकऱ्यांना करून दाखवले.तसेच बुरशीनाशक वापरल्याने पिकाच्या उत्पन्नात वाढ होते हेही शेतकरी वर्गाला सांगितले .

या उपक्रमातंर्गत पिक कर्ज कसे काढावे याचे प्रात्यक्षिक माळीनगर येथील शेतकऱ्यांना करून दाखवले. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्राचार्य नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्राधापक एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम प्रा. एम.एम. चंदनकर, प्रा. एच. व्ही. कल्याणी यांच्या मार्गदर्शनानुसार कृषिदूत भाग्यश्री कदम, आकांक्षा मोरे, लक्ष्मी कोरे, श्वेता भडंगे, रोहिणी गोलेकर, मेघना मोरे, प्रशाली पवार, अंकिता भोगवडे, प्रणाली देशमुख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
